अरुण योगीराज यांनी साकारली रामलल्ला मूर्ती
एमबीए पदवीधर असूनही कौटुंबीक वारसा जपला : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती निश्चित
वार्ताहर /बेंगळूर
अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्dयासाठी विविध मान्यवर व राजकारण्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती निश्चित झाली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सदर मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. अरुण योगीराज हे म्हैसूर येथील प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. मूर्तिकार योगीराज यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे आजोबा म्हैसूरच्या वडेयर राजघराण्याच्या महालात नक्षीकाम करत असत. 2008 मध्ये अरुण यांनी एमबीए पूर्ण केले. एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर आजोबांच्या इच्छेखातर त्यांनी मूर्तिकाम करण्यास सुरुवात केली.
अरुण यांनी आठवडाभरापूर्वी मूर्ती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द केली. रामलल्लाची सुंदर मूर्ती कोरण्यासाठी त्यांना 6 महिने लागले. या काळात ते अयोध्येत राहिले. ते दररोज 12 ते 14 तास कामात गुंतले होते. त्यांनी रामलल्ला मूर्तीबरोबरच लक्ष्मण, सीता आणि श्री रामभक्त हनुमानाची मूर्ती कोरली आहे. अरुण यांनी तयार केलेल्या रामलल्ला मूर्तीची 22 जानेवारीला अयोध्येत प्रतिष्ठापना होणार असल्याचे समजताच त्यांच्या म्हैसूरमधील निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. मूर्तीच्या कोरीवकामासाठी आपले पती 6 महिने अयोध्येत राहिले. त्यांनी तयार केलेल्या मूर्तीची निवड झाली, असे सांगताना अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता भावुक झाल्या.
आव्हानात्मक काम
आम्हाला 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे रामलल्लाची मूर्ती साकारायची होती. या मूर्तीची उंची पायापासून कपाळापर्यंत 51 इंच असावी, अशी अट घातली होती. यासाठी मी खूप अभ्यास केला. मला कुठेही बालरुपातील रामाचे चित्र सापडले नाही. मी मुलांच्या शाळेत गेलो. तिथल्या मुलांचे रूप पाहिले. मला 3 ते 5 वर्षांच्या मुलांमधला फरक दिसला, असे अरुण यांनी सांगितले. आपण कोरीव काम करावे, असा विचार करून कामाला सुरुवात केली. अखेर धनुष्यबाण घेऊन उभा असलेल्या रामलल्लाची मूर्ती निर्माण केली, असेही त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी अरुण योगीराज यांनी साकारली रामलल्ला मूर्ती
अरुण योगीराज यांनी साकारली रामलल्ला मूर्ती
एमबीए पदवीधर असूनही कौटुंबीक वारसा जपला : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती निश्चित वार्ताहर /बेंगळूर अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्dयासाठी विविध मान्यवर व राजकारण्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती निश्चित झाली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री प्रल्हाद […]