विश्वकर्मा योजनेसाठी दीड लाख अर्ज!
राज्यात बेळगाव आघाडीवर : व्यवसाय विस्तारासाठी प्रतिसाद
बेळगाव : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1.51 लाख जणांनी अर्ज केले आहेत. राज्यात बेळगाव जिल्हा अर्ज करण्यात आघाडीवर आहे. या योजनेंतर्गत पारंपरिक व्यवसायाबरोबर 18 पद्धतीच्या कारागिरांना प्रशिक्षण देऊन उद्योग विस्तारासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातून या योजनेसाठी प्रतिसाद वाढला आहे. बेरोजगारीमुळे तरुण लहान-सहान व्यवसायाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे या योजनेला प्रतिसाद वाढू लागला आहे. पहिल्या टप्प्यात गावपातळीवर ही योजना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत 18 श्रेणीतील कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण, तांत्रिक माहिती, नवीन उपकरणे आणि सुरक्षित कर्ज सुविधा त्याबरोबर उत्पादित मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. इच्छुकांनी www.pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पात्रता-निकष
व्यवसाय, स्वयंरोजगार असल्यास त्याला कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लाभार्थी 18 वर्षांवरील असावा. शिवाय कुटुंबातील फक्त एकच सदस्य नोंदणीसाठी पात्र आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. सुतार, कुंभार, शिंपी, सोनार, लोहार, शिल्पकार, माशाचे जाळे बनविणारे, बोट बनविणारे, गवंडी, पारंपरिक टोपली, चटई, झाडू, दोरी बनविणारे, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनविणाऱ्या कारागीरांचा या योजनेत समावेश आहे. तांत्रिक विद्यापीठ कौशल्य प्रशिक्षण केंद्र, केएलई कृषी विज्ञान केंद्र, कॅनरा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यासह इतर ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. लहान आणि मध्यम व्यवसाय सुरू करणाऱ्या बेरोजगार तरुणांना ही योजना आधार ठरू लागली आहे.
व्यवसायासाठी उत्तम
जिल्हास्तरीय समितीद्वारे उमेदवाराची निवड केली जाते. त्यानंतर प्रशिक्षण दिले जाते. कमी व्याजदरात रक्कम दिली जाते. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. व्यवसाय विस्तारासाठी ही योजना उत्तम आहे. जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
– चिदानंद बाके (जिल्हा कौशल्य विकास अधिकारी)
Home महत्वाची बातमी विश्वकर्मा योजनेसाठी दीड लाख अर्ज!
विश्वकर्मा योजनेसाठी दीड लाख अर्ज!
राज्यात बेळगाव आघाडीवर : व्यवसाय विस्तारासाठी प्रतिसाद बेळगाव : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1.51 लाख जणांनी अर्ज केले आहेत. राज्यात बेळगाव जिल्हा अर्ज करण्यात आघाडीवर आहे. या योजनेंतर्गत पारंपरिक व्यवसायाबरोबर 18 पद्धतीच्या कारागिरांना प्रशिक्षण देऊन उद्योग विस्तारासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातून या योजनेसाठी […]