अर्मेनियाने दिली पॅलेस्टाईनला मान्यता

वृत्तसंस्था / मॉस्को अर्मेनिया या मध्य आशियातील देशाने पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिली आहे. पॅलेस्टाईन हा इस्रायल नजीकचा भाग असून त्यावर इस्रायलचे नियंत्रण आहे. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझापट्टीत भीषण युद्ध होत आहे. हे युद्ध होत असतानाच अर्मेनियाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घोषित केला. अर्मेनियाच्या विदेश व्यवहार विभागाने शुक्रवारी ही घोषणा केली. गाझापट्टीत […]

अर्मेनियाने दिली पॅलेस्टाईनला मान्यता

वृत्तसंस्था / मॉस्को
अर्मेनिया या मध्य आशियातील देशाने पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिली आहे. पॅलेस्टाईन हा इस्रायल नजीकचा भाग असून त्यावर इस्रायलचे नियंत्रण आहे. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझापट्टीत भीषण युद्ध होत आहे. हे युद्ध होत असतानाच अर्मेनियाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घोषित केला. अर्मेनियाच्या विदेश व्यवहार विभागाने शुक्रवारी ही घोषणा केली.
गाझापट्टीत होत असलेले युद्ध त्वरित थांबविले जावे, या संयुक्त राष्ट्रसंघाने संमत केलेल्या प्रस्तावाला अर्मेनिया पाठिंबा देत आहे. पॅलेस्टाईनच्या नागरिकांना त्यांचे स्वतंत्र देश म्हणून जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत असे आमच्या देशाचे म्हणणे आहे, असे वक्तव्य अर्मेनियाने प्रसिद्ध केले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा अर्मेनिया हा चौथा देश आहे. नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड या आणखी तीन देशांनीही मान्यता दिली आहे. पॅलेस्टाईनला केवळ मर्यादित स्वातंत्र्यच मिळू शकते, अशी बहुतेक युरोपियन देशांची धारणा आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने अनेकदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणी झालेली आहेत. मात्र, ती असफल ठरली आहेत.