वेबसीरिजमध्ये झळकणार ऋता

कमांडर करण सक्सेना’मध्ये गुरमीत टीव्हीक्षेत्रात स्वत:च्या अभिनयाने ठसा उमटविणारा अभिनेता गुरमीत चौधरी प्रेक्षकांच्या पसंतीचा कलाकार आहे. गुरमीत आता लवकरच ओटीटीवर वेबसीरिजद्वारे पदार्पण करणार आहे. त्याची आगामी वेबसीरिज ‘कमांडर करण सक्सेना’चा टीझर जारी करण्यात आला आहे. या वेबसीरिजद्वारे मराठी अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारची बहुप्रतीक्षित वेबसीरिज ‘कमांडर करण सक्सेना’मध्ये गुरमीत मुख्य भूमिकेत आहे. […]

वेबसीरिजमध्ये झळकणार ऋता

कमांडर करण सक्सेना’मध्ये गुरमीत
टीव्हीक्षेत्रात स्वत:च्या अभिनयाने ठसा उमटविणारा अभिनेता गुरमीत चौधरी प्रेक्षकांच्या पसंतीचा कलाकार आहे. गुरमीत आता लवकरच ओटीटीवर वेबसीरिजद्वारे पदार्पण करणार आहे. त्याची आगामी वेबसीरिज ‘कमांडर करण सक्सेना’चा टीझर जारी करण्यात आला आहे. या वेबसीरिजद्वारे मराठी अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारची बहुप्रतीक्षित वेबसीरिज ‘कमांडर करण सक्सेना’मध्ये गुरमीत मुख्य भूमिकेत आहे. याचा टीजर पाहिल्यावर ही सीरिज अॅक्शनबेस्ड असल्याचे स्पष्ट होते. जतिन सतीश वागळेच्या दिग्दर्शनाखालील या सीरिजला कीलाइट प्रॉडक्शनने निर्मित केले आहे. गुरमीत आणि इक्बाल खान यांच्यासोबत यात ऋता दुर्गुळे ही मराठी अभिनेत्री दिसून येणार आहे. ऋता देखील याद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही सीरिज 8 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.