हॉकी इंडिया बरोबरच्या करारात वाढ
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडीशा राज्यामध्ये नव्यानेच निवडून आलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील ओडीशा शासनाने हॉकी इंडियाबरोबरच्या पुरस्कर्त्याच्या करारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हॉकी इंडिया आणि ओडीशा शासन यांच्यात 2036 पर्यंत पुरस्कर्त्याचा करार राहिल.
ओडीशा शासनाच्या स्थापनेला 2036 साली 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव ओडीशा शासनाने हॉकी इंडिया बरोबरच्या पुरस्कर्त्याचा करार 2036 पर्यंत कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच ओडिशा शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की तसेच सरचिटणीस भोलानाथ सिंग ओडीशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांजी यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. या निर्णयामुळे ओडीशा राज्यातील क्रीडा क्षेत्राची सुधारणा होण्यास मदत होईल.
Home महत्वाची बातमी हॉकी इंडिया बरोबरच्या करारात वाढ
हॉकी इंडिया बरोबरच्या करारात वाढ
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर ओडीशा राज्यामध्ये नव्यानेच निवडून आलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील ओडीशा शासनाने हॉकी इंडियाबरोबरच्या पुरस्कर्त्याच्या करारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हॉकी इंडिया आणि ओडीशा शासन यांच्यात 2036 पर्यंत पुरस्कर्त्याचा करार राहिल. ओडीशा शासनाच्या स्थापनेला 2036 साली 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव ओडीशा शासनाने हॉकी इंडिया बरोबरच्या पुरस्कर्त्याचा करार 2036 पर्यंत कायम राखण्याचा […]