‘एफएमसीजी’च्या विक्रीसाठी ग्रामीण भारतात सकारात्मक स्थिती
ग्रामीण बाजाराचे वर्णन ‘चमकणारा तारा’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दैनंदिन घरगुती वस्तूंच्या (एफएमसीजी) विक्रीच्या वाढीसाठी ग्रामीण भारत हा ‘चमकणारा तारा’ राहिला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत या क्षेत्राने शहरी भागापेक्षा विस्ताराचा वेग चांगला राखला जाईल अशी अपेक्षा आहे.
डेटा आणि सल्लागार कंपनी कांतारच्या अहवालानुसार, ग्रामीण भारत शहरीपेक्षा चांगला विकास स्तर राखणार आहे. वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) एफएमसीजी कंपन्यांसाठी ग्रामीण बाजाराचे वर्णन ‘चमकणारा तारा’ असे केले आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने क्षेत्र-केंद्रित उपाययोजनांमुळे ग्रामीण भागातील या वाढीला मदत झाली आहे आणि त्यामुळे स्थिरता आली आहे. या येणाऱ्या महिन्यात काही राज्यात निवडणुका होणार असून त्यावेळी एफएमसीजी वस्तुंच्या मागणीत वाढीचा अंदाज आहे.
कोविड-19 नंतर, ग्रामीण बाजारपेठ संकटात होती आणि मागील तिमाहीत सतत घसरणीला सामोरे जावे लागले होते. 2024 चा प्रारंभ हा सकारात्मकच तथापि, 2024 ची सुरुवात ग्रामीण दृष्टीकोनातून चांगली झाली आहे. ग्रामीण विकासाने शहरी विकासाला मागे टाकले आहे आणि ग्रामीण क्षेत्र प्रगती साधण्याच्या दिशेने सरकत असताना दिसत आहे.
Home महत्वाची बातमी ‘एफएमसीजी’च्या विक्रीसाठी ग्रामीण भारतात सकारात्मक स्थिती
‘एफएमसीजी’च्या विक्रीसाठी ग्रामीण भारतात सकारात्मक स्थिती
ग्रामीण बाजाराचे वर्णन ‘चमकणारा तारा’ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दैनंदिन घरगुती वस्तूंच्या (एफएमसीजी) विक्रीच्या वाढीसाठी ग्रामीण भारत हा ‘चमकणारा तारा’ राहिला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत या क्षेत्राने शहरी भागापेक्षा विस्ताराचा वेग चांगला राखला जाईल अशी अपेक्षा आहे. डेटा आणि सल्लागार कंपनी कांतारच्या अहवालानुसार, ग्रामीण भारत शहरीपेक्षा […]