नक्की काय शिजतंय ? शरद पवार-वडेट्टीवार यांची बंद खोलीत चर्चा
बारामती : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी शनिवारी (दि. १८) भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.
वडेट्टीवार हे बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी (दि १७) रात्रीपासून बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार आणि वडेट्टीवार यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर पवार यांच्या समवेत वडेट्टीवार यांनी कृषी विकास प्रतिष्ठानच्या अटल इनक्यूबेशन सेंटरला भेट देण्यासाठी निघून गेले. वडेट्टीवार बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला भेट देणार आहेत. तेथून ते पत्रकारांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक
Pune Crime News : शिक्षिकेचे अपहरण अन् सुटकेचा थरार
The post नक्की काय शिजतंय ? शरद पवार-वडेट्टीवार यांची बंद खोलीत चर्चा appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी शनिवारी (दि. १८) भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. वडेट्टीवार हे बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी (दि १७) रात्रीपासून बारामती …
The post नक्की काय शिजतंय ? शरद पवार-वडेट्टीवार यांची बंद खोलीत चर्चा appeared first on पुढारी.