Manoj Jarange : संगमनेरला मनोज जरांगे यांची बुधवारी सभा
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पा. यांची बुधवार दि.22 रोजी दुपारी 3 वाजता येथील जाणता राजा या 6 एकराच्या मैदानावर विराट सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. मराठा समाज आरक्षणासाठी जरांगे पा. यांनी अंतरावली सराटीयेथे आमरण उपोषण केले होते, मात्र दिपावली हा हिंदूधर्मियांचा सर्वात मोठा सण आनंदात साजरा करता यावा, सरकारला कुणबीच्या नोंदी शोधण्यास कालावधी देण्यात यावा, यासाठी त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते.
सरकारने 24 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरू करु, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हाधिकार्यांना कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जरांगे यांनी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला येथून जरांगे थेट संगमनेरात येणार आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागतानंतर जाणता राजा मैदानावर सभेस ते रवाना होणार आहेत. सभेसाठी जाणता राजा मैदानाची साफसफाई करून स्टेज उभारणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातून येणा र्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा :
Nagar : मुळा, भंडारदरातून जायकवाडीला पाणी न सोडण्यावर नेत्यांचे एकमत
Weather Update : पुणे, नाशिक गारठले
The post Manoj Jarange : संगमनेरला मनोज जरांगे यांची बुधवारी सभा appeared first on पुढारी.
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पा. यांची बुधवार दि.22 रोजी दुपारी 3 वाजता येथील जाणता राजा या 6 एकराच्या मैदानावर विराट सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. मराठा समाज आरक्षणासाठी जरांगे पा. यांनी अंतरावली सराटीयेथे आमरण उपोषण केले होते, मात्र …
The post Manoj Jarange : संगमनेरला मनोज जरांगे यांची बुधवारी सभा appeared first on पुढारी.