पुणे : अग्निशमनच्या जवानांमुळे चिमुकल्याची सुटका
पुणे : सिंहगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द येथील राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसर्या मजल्यावर गॅलरीत असलेल्या लोखंडी अँगलमध्ये लहान बाळ अडकल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्रातून तातडीने अग्निशमन वाहन रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचताच जवानांनी चिमुकल्याची तत्काळ सुटका केली.
घटनास्थळी जवानांना समजले की, दुसर्या मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये लोखंडी अँगलमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले असून दरवाजादेखील बंद झाला आहे. जवानांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि प्रथम अग्निशमन वाहनातील कॉम्बी टुल किटमधील हायड्रोलिक स्प्रेडर व जॅकचा वापर करून दरवाजाची कडी तोडून पाहिले, तेव्हा बाळाचे डोके त्या लोखंडी अँगलमध्ये अडकले असून, बाळ तळमळत असल्याचे त्यांना दिसले.
बाळाच्या आईला त्याच्याजवळ बसवत कुशलतेने अग्निशमन उपकरण वापरून बाळाची पाचच मिनिटांत सुखरूप सुटका केली. सिंहगड अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक अशोक कडू व जवान तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांनी मुलाची
सुटका केली.
हेही वाचा
नक्की काय शिजतंय ? शरद पवार-वडेट्टीवार यांची बंद खोलीत चर्चा
Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्यावर येणार
समन्यायी पाणी वाटप; डॉ. विखे कारखान्याकडून याचिका दाखल
The post पुणे : अग्निशमनच्या जवानांमुळे चिमुकल्याची सुटका appeared first on पुढारी.
पुणे : सिंहगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द येथील राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसर्या मजल्यावर गॅलरीत असलेल्या लोखंडी अँगलमध्ये लहान बाळ अडकल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्रातून तातडीने अग्निशमन वाहन रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचताच जवानांनी चिमुकल्याची तत्काळ सुटका केली. घटनास्थळी जवानांना समजले की, दुसर्या मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये लोखंडी अँगलमध्ये एक वर्षाचे …
The post पुणे : अग्निशमनच्या जवानांमुळे चिमुकल्याची सुटका appeared first on पुढारी.