Accident News : वेगवान दुचाकीची एसटी बसला धडक
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पीकअप टेम्पोला वेगात ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या एसटी बसला दुचाकीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार रुग्णालयात पोहचताना गतप्राण झाला आहे. गतप्राण झालेल्या दुचाकीस्वारापैकी एक हिवरे (ता. जुन्नर) तर दुसरा घारगाव (ता. अकोले) येथील असल्याची जुजबी माहिती मिळाली आहे.
हा भीषण अपघात ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील नगर कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे सकाळी सव्वा अकरा वाजता घडला असून दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीकअप टेम्पो उलटला असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची खबर मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.
The post Accident News : वेगवान दुचाकीची एसटी बसला धडक appeared first on पुढारी.
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पीकअप टेम्पोला वेगात ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या एसटी बसला दुचाकीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार रुग्णालयात पोहचताना गतप्राण झाला आहे. गतप्राण झालेल्या दुचाकीस्वारापैकी एक हिवरे (ता. जुन्नर) तर दुसरा घारगाव (ता. अकोले) येथील असल्याची जुजबी माहिती मिळाली आहे. हा भीषण अपघात ओतूर (ता. …
The post Accident News : वेगवान दुचाकीची एसटी बसला धडक appeared first on पुढारी.