धुळे : शेतातील शेडमधून 32 क्विंटल कापसाची चोरी
पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा-साक्री तालुक्यातील चिंचखेडा येथे शेतातील शेडमध्ये गोळा करून ठेवलेली 32 क्विंटल कपाशी चोरट्यांनी लंपास केली.
चिंचखेडा येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची म्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावर बागायती शेती आहे. याच शेतात पाटील यांचे वास्तव्य आहे. शेतातील घराच्या हाकेच्या अंतरावर पाटील यांनी शेतातीत माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड तयार केले आहे. शेतातून गोळा केलेली 32 क्विंटल कपाशी पोत्यांमध्ये भरून ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून कपाशीला समाधानकारक भाव नसल्यामुळे कपाशी राखून ठेवली होती. मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या शेड मधील कपाशी लंपास केली. सकाळी केदार पाटील शेतातील शेडकडे गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. या घटनेची माहिती पाटील यांनी कुटुंबाला देताच कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. दरम्यान सध्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट झालेला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचा :
Madhya Pradesh Assembly elections 2023 | मध्य प्रदेशात दिमानी मतदारसंघात मतदानावेळी दगडफेक, गोळीबार
ऑनलाईन औषध विक्रीबाबत दोन महिन्यांत धोरण बनवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
The post धुळे : शेतातील शेडमधून 32 क्विंटल कापसाची चोरी appeared first on पुढारी.
पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा-साक्री तालुक्यातील चिंचखेडा येथे शेतातील शेडमध्ये गोळा करून ठेवलेली 32 क्विंटल कपाशी चोरट्यांनी लंपास केली. चिंचखेडा येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची म्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावर बागायती शेती आहे. याच शेतात पाटील यांचे वास्तव्य आहे. शेतातील घराच्या हाकेच्या अंतरावर पाटील यांनी शेतातीत माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड तयार केले आहे. शेतातून गोळा केलेली …
The post धुळे : शेतातील शेडमधून 32 क्विंटल कापसाची चोरी appeared first on पुढारी.