मध्य प्रदेशात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या दोन राज्यांत आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी पहिल्याच टप्प्यात, तर छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागांपैकी दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मध्य प्रदेशात २७.६२  टक्के तर छत्तीसगडमध्ये १९.६५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील काही मतदारसंघात मतदानावेळी दगडफेक आणि … The post मध्य प्रदेशात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार appeared first on पुढारी.

मध्य प्रदेशात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या दोन राज्यांत आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी पहिल्याच टप्प्यात, तर छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागांपैकी दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मध्य प्रदेशात २७.६२  टक्के तर छत्तीसगडमध्ये १९.६५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील काही मतदारसंघात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार सारख्या हिंसाचाराच्या घटना घडल्या. (Madhya Pradesh Assembly elections 2023)
दिमानी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र १४८ वर मतदानावेळी गोंधळ झाला. दोन्ही पक्षाच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे तसेच दरम्यान गोळीबार झाल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांची जमावाला बाजूला करत हस्तक्षेप केला. दिमानी विधानसभा मतदारसंघावर सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. या मतदार संघातून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे भाजपचे उमेदवार आहेत. दरम्यान, मतदान केंद्रावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Assembly election 2023)
मुरैना जिल्ह्यातील दिमानी विधानसभा मतदारसंघातील मिरघन मतदान केंद्र क्रमांक १४७-१४८ येथे वादाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मतदारांना सुरक्षा पुरवून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणले. पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र दगडफेकीत एक मतदार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता मतदान शांततेत सुरू आहे. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मतदारांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Madhya Pradesh Assembly elections 2023)
हेही वाचा:

Chhattisgarh Assembly Election 2023 | छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत
Rajasthan Assembly Election : मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणुकीतून होणार बाद?

The post मध्य प्रदेशात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या दोन राज्यांत आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी पहिल्याच टप्प्यात, तर छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागांपैकी दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मध्य प्रदेशात २७.६२  टक्के तर छत्तीसगडमध्ये १९.६५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील काही मतदारसंघात मतदानावेळी दगडफेक आणि …

The post मध्य प्रदेशात मतदानावेळी दगडफेक आणि गोळीबार appeared first on पुढारी.

Go to Source