सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वॉर्नर ब्रदर्समध्ये होस्ट मनीष पॉलसोबत भारताच्या इतिहासातील संस्मरणीय खजिन्यांचा शोध लावणार आहेत. २० नोव्हेंबरपासून डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ही आठ भागांची डॉक्युसिरीज प्रसारित होईल. प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलद्वारे सादर केल्या जाणा-या ह्या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये देशभरातील अज्ञात उल्लेखनीय ऐतिहासिक तथ्यांचे अन्वेषण करून ती समोर आणली जातील. समोर असलेल्या … The post सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे appeared first on पुढारी.

सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वॉर्नर ब्रदर्समध्ये होस्ट मनीष पॉलसोबत भारताच्या इतिहासातील संस्मरणीय खजिन्यांचा शोध लावणार आहेत. २० नोव्हेंबरपासून डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ही आठ भागांची डॉक्युसिरीज प्रसारित होईल. प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलद्वारे सादर केल्या जाणा-या ह्या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये देशभरातील अज्ञात उल्लेखनीय ऐतिहासिक तथ्यांचे अन्वेषण करून ती समोर आणली जातील. समोर असलेल्या प्रश्नांचा उलगडा करण्याच्या व तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या त्याच्या मोहीमेमध्ये मनीषसोबत विशेषज्ञ असतील.
संबंधित बातम्या –

Tiger ३ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण
Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये
Khurchi Movie : ‘कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला’; राकेश बापटची एन्ट्री

देशाचा वारसा असलेले मैलाचे दगड, उल्लेखनीय व्यक्ती आणि ऐतिहासिक घडामोडींसह भारताचा इतिहास देशभरातील लोकांना आजही अचंबित करतो. कोणत्याही आधुनिक यंत्र तंत्रज्ञानाशिवाय २०० फूट उंचीवर टांगण्यात आलेल्या ८० टनांच्या खडकामागचे अजूनही न उलगडलेल्या अभियांत्रिकीचे कोडे आहे. तसेच टिपू सुलतान व त्याचे वडील हैदर अली ह्यांनी कशा प्रकारे जगातील पहिले उपयोगात आणता येणारे सेनेसाठीचे रॉकेट बनवले व ते कसे ब्रिटीशांसाठी प्रेरणादायी ठरले हे शोधण्यापासून ते प्रसिद्ध सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती आहे हे शोधण्यापर्यंत आणि लक्षाधीशांचे शहर असलेले लखपत शहर कसे उजाड बनले हे शोधण्यापर्यंत ‘हिस्टरी हंटरमध्ये’ आजवर उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांमागचे गूढ उलगडण्यापर्यंत रहस्याचा मागोवा घेतला जाईल.
‘हिस्टरी हंटर’ ह्या आठ भागांच्या मालिकेमध्ये नालंदा विद्यापीठ, गोवळकोंडा किल्ला, महाबलीपूरम, तमिळनाडूतील बृहदेश्वर मंदिर, लखपत शहर आणि सरस्वती नदी या ऐतिहासिक बाबींवर प्रकाश टाकला जाईल. ‘हिस्टरी हंटर’ डिस्कव्हरी चॅनलवर २० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.
The post सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : वॉर्नर ब्रदर्समध्ये होस्ट मनीष पॉलसोबत भारताच्या इतिहासातील संस्मरणीय खजिन्यांचा शोध लावणार आहेत. २० नोव्हेंबरपासून डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ही आठ भागांची डॉक्युसिरीज प्रसारित होईल. प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलद्वारे सादर केल्या जाणा-या ह्या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये देशभरातील अज्ञात उल्लेखनीय ऐतिहासिक तथ्यांचे अन्वेषण करून ती समोर आणली जातील. समोर असलेल्या …

The post सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे appeared first on पुढारी.

Go to Source