विशाळगड : पुढारी वृत्तसेवा शाहुवाडी तहसील कार्यालयाकडुन कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहा सर्कल विभागासह तीन तज्ञ मोडीवाचकांच्या सहाय्याने हे काम सुरू आहे. आजअखेर ९३ हजार ५३५ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून, आजअखेर ६ हजार ५४२ कुणबीच्या नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. तालुक्यात १० हजार ११५ महसुली अभिलेखाच्या १० हजार ११५ नोंदी, भूमिअभिलेख विभागाकडील ६८२ नोंदी तपासल्या असता त्यामध्ये एकही कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत. जन्म-मृत्यूच्या तपासलेल्या १९ हजार ९६२ नोंदीमध्ये ६ हजार १० कुणबीच्या नोंदी आढळल्या.
शैक्षणिक अभिलेखाच्या ६२ हजार ७७६ तपासलेल्या नोंदीमध्ये ५३२ नोंदी कुणबी आढळल्या आहेत. अशा एकूण आजअखेर ९३ हजार ५३५ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून, आजअखेर ६ हजार ५४२ कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. तालुक्यात नोंदी शोधण्याचे काम अजून सुरूच असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. मोडी तज्ञ प्रा. वसंत सिंघण, अमर पाटील, श्रीधर पाटील मोडीतील नोंदी शोधण्यासाठी प्रशासनास सहकार्य करत आहेत. यावेळी निवासी तहसीलदार गणेश लवे, महसुल नायब तहसिलदार रवींद्र मोरे उपस्थित होते. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा :
Kolhapur Politics | मेव्हण्या-पाव्हण्यांचे ‘बिद्री’त का बिनसले?; ए.वाय., मंडलिक, आबिटकर, घाटगे, महाडिक एकत्र
Balasaheb Thackeray Smrutidin:”मातोश्रीच्या गोटातले घरभेदी”, नारायण राणेंनी शेअर केली बाळासाहेब ठाकरेंची आठवण
राज्यातील भूपृष्ठांची पाण्यासाठी चाळण; दरवर्षी दीड लाखांवर कूपनलिकांची खोदाई
The post कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त आढळल्या ६ हजार ५४२ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.
विशाळगड : पुढारी वृत्तसेवा शाहुवाडी तहसील कार्यालयाकडुन कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहा सर्कल विभागासह तीन तज्ञ मोडीवाचकांच्या सहाय्याने हे काम सुरू आहे. आजअखेर ९३ हजार ५३५ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून, आजअखेर ६ हजार ५४२ कुणबीच्या नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ …
The post कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त आढळल्या ६ हजार ५४२ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.