बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; २४ तासांत चक्रीवादळाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या कमी दाबाचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सहे उत्तर इशान्यकडे सरकरत आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर (cyclone Midhili) होण्याची शक्यता आहे. … The post बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; २४ तासांत चक्रीवादळाची शक्यता appeared first on पुढारी.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; २४ तासांत चक्रीवादळाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या कमी दाबाचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सहे उत्तर इशान्यकडे सरकरत आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर (cyclone Midhili) होण्याची शक्यता आहे. या चक्रीय स्थितीचा ओडिशावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. ते पुढे बांगलादेशच्या किनारपट्टीकडे जाईल, असेही आयएमडीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.  (Cyclone Alert
आयएमडीने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे पुढच्या काही तासांत तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. परंतु त्याचा ओडिशावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही आणि ते बांगलादेशच्या किनारपट्टीकडे पुढे जाईल. तसेच शेजारच्या बांगलादेशातील मोंगला आणि खेपुपारा भागांमध्ये या चक्रीवादळाने भूस्खलन होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर असू शकतो, असेही IMD शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. (Cyclone Alert)
पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ तीव्र होऊन मोंगला आणि खेपुपारा दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतातील नागालँड, मणिपूर, आसाम आणि मेघालयमध्ये शनिवारपर्यंत (दि.१८) पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘सायक्लोन मिधिली’ असे नाव दिले जाणार असून, हे नाव मालदीवने सुचवले आहे, असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Cyclone Alert)
देशभरातील हवामान परिस्थिती
• चक्रीवादळामुळे, १७ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये १८ नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
• याशिवाय, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आसाम आणि पूर्व मेघालयातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
• हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीय परिस्थितीमुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात किरकोळ नुकसान होण्याची शक्यता आहे.
• २० नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने म्हटले आहे.
• तामिळनाडू आणि केरळमध्ये १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पूर्वेकडील स्थितीमुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
• दरम्यान पूर्व आणि आग्नेयकडील समुद्रकिनाऱ्यावरील मच्छिमारांना शनिवारपर्यंत खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. कारण या काळात समुद्र खवळलेला असणार आहे.
हेही वाचा:

History Hunter : सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे
Kolhapur Politics | मेव्हण्या-पाव्हण्यांचे ‘बिद्री’त का बिनसले?; ए.वाय., मंडलिक, आबिटकर, घाटगे, महाडिक एकत्र

The post बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; २४ तासांत चक्रीवादळाची शक्यता appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या कमी दाबाचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सहे उत्तर इशान्यकडे सरकरत आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर (cyclone Midhili) होण्याची शक्यता आहे. …

The post बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; २४ तासांत चक्रीवादळाची शक्यता appeared first on पुढारी.

Go to Source