मंदीचा फटका! चीपमेकर ‘इंटेल’मध्ये पुन्हा नोकरकपात, २३५ कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन : बाजारातील मंदीचे कारण देत दिग्गज चीपमेकर टेक कंपनी इंटेल पुन्हा एकदा नोकरकपात करणार आहे. या नोकरकपातीचा २३५ कर्मचाऱ्यांना धक्का बसणार आहे. अमेरिकेतील सॅक्रामेंटो काउंटीच्या फॉलसम कॅम्पसमधील संशोधन आणि विकास विभागातील २३५ नोकऱ्या कमी करण्याच्या योजना इंटेलने उघड केली आहे. ही नोकरकपात ३१ डिसेंबरपासून सुरू होईल आणि ती दोन आठवड्यांच्या कालावधीत होईल. या … The post मंदीचा फटका! चीपमेकर ‘इंटेल’मध्ये पुन्हा नोकरकपात, २३५ कर्मचाऱ्यांना नारळ appeared first on पुढारी.
मंदीचा फटका! चीपमेकर ‘इंटेल’मध्ये पुन्हा नोकरकपात, २३५ कर्मचाऱ्यांना नारळ


Bharat Live News Media ऑनलाईन : बाजारातील मंदीचे कारण देत दिग्गज चीपमेकर टेक कंपनी इंटेल पुन्हा एकदा नोकरकपात करणार आहे. या नोकरकपातीचा २३५ कर्मचाऱ्यांना धक्का बसणार आहे. अमेरिकेतील सॅक्रामेंटो काउंटीच्या फॉलसम कॅम्पसमधील संशोधन आणि विकास विभागातील २३५ नोकऱ्या कमी करण्याच्या योजना इंटेलने उघड केली आहे. ही नोकरकपात ३१ डिसेंबरपासून सुरू होईल आणि ती दोन आठवड्यांच्या कालावधीत होईल. या वर्षातील नोकरकपातीची ही पाचवी फेरी असेल. (Intel layoffs)
ही माहिती राज्य नियामक फाइलिंगमधून मिळाली असल्याचे वृत्त सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलने दिले आहे. कंपनीचे उद्दिष्ट कार्यवाही सुव्यवस्थित करण्याचे आहे. इंटेलच्या प्रवक्त्याने विशिष्ट व्यवसाय विभागांसह त्याच्या कार्यवाहीच्या विविध क्षेत्रांमध्ये खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवताना कंपनीची धोरणात्मक दिशा पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, “इंटेल अनेक उपक्रमांद्वारे खर्च कमी करताना आपल्या रणनीतीला गती देण्यावर भर देत आहे. ज्यात नोकरकपातीचाही समावेश आहे,” असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
हे पाऊल आगामी वर्षातील अतिरिक्त कर्मचारी कपातीची पूर्वसूचना असू शकते. यातून कंपनीमध्ये पुढील पुनर्रचना होण्याची शक्यता सूचित होते. यापूर्वी इंटेलने त्याच्या फॉलसम कॅम्पसमधील ५४९ पदे कमी केली होती. ही नोकरकपात संपूर्ण कर्मचार्‍यांपैकी सुमारे १० टक्के होती.
खर्च कपातीवर भर
नोकरकपातीची ही फेरी इंटेलच्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी संबंधित कारणांमुळे आहे. या कंपनीने २०२२ मध्ये नोकरकपात, कामाचे कमी तास आणि संभाव्य विभाजन विभागणी यांद्वारे २०२५ पर्यंत खर्च १० अब्ज डॉलरने कमी करण्याचा त्यांचा हेतू जाहीर केला होता.
हो नोकरकपात असूनही इंटेलने कॅलिफोर्नियामध्ये १३ हजारांहून अधिक एवढे मनुष्यबळ कायम ठेवले आहे. विविध संशोधन आणि विकास प्रयत्नांचे केंद्र असलेल्या फोलसम कॅम्पसने कंपनीच्या SSDs, ग्राफिक्स प्रोसेसर्स, सॉफ्टवेअर आणि चिपसेटच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Intel layoffs)
मंदीचा कंपनीला फटका
ऑक्टोबरमध्ये कमाई अहवाल जाहीर करण्याच्या दरम्यान इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी जाहीर केले होते की पर्सनल कंप्यूटर बाजारपेठेतील मंदीमुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीला मोठा धक्का बसला आहे. तिसर्‍या तिमाहीच्या निकालात कंपनीच्या महसुलात लक्षणीय घट दर्शविली होती.
The post मंदीचा फटका! चीपमेकर ‘इंटेल’मध्ये पुन्हा नोकरकपात, २३५ कर्मचाऱ्यांना नारळ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source