मराठी वेब सीरिजचे जग मंदावले; ओटीटीवर थंड प्रतिसाद
सुवर्णा चव्हाण
पुणे : मराठी वेब सीरिजचा डंका मागील वर्षी सगळीकडे पाहायला मिळत होता, अगदी ओटीटीवरही वेब सीरिज गाजत होत्या. पण, गेल्या सहा महिन्यांपासून मराठी वेब सीरिजचे जग थंडावले आहे, नव्या सीरिजची निर्मितीही मंदावली आहे. ओटीटीकडून मिळणारा थंड प्रतिसाद, सीरिज बनविणे निर्मात्यांसाठी झालेली खर्चीक बाब, घटलेली प्रेक्षक संख्या अशा विविध कारणांमुळे सीरिजची निर्मिती घटली आहे. फक्त यू-ट्यूब चॅनेलपुरते सीरिजचे जग मर्यादित झाले आहे, येथेही नवीन सीरिजचे प्रमाण घटले आहे.
कोरोना काळानंतर मराठी वेब सीरिजचे जग रुळावर आले होते. नवीन सीरिजची निर्मिती होत होती आणि गेल्या वर्षी तर काही सीरिज ओटीटीवरही झळकल्या. परंतु, आताच्या घडीला सीरिज बनविणे खर्चीक झाल्याने सीरिज निर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे. ओटीटीकडूनही मराठी सीरिजला कमी प्रतिसाद आहे. याविषयी वेब सीरिजचे दिग्दर्शक नितीन पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून ओटीटीकडून सीरिजला कमी प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक जोखीम पत्करणे दिग्दर्शक-निर्मात्यांना परवडणारे नसून, नवीन सीरिजची निर्मितीही कमी झाली आहे. काही निर्माते-दिग्दर्शक जोखीम पत्करुन यू-ट्यूबसाठी सीरिजची निर्मिती करत आहेत. हे चित्र पालटले पाहिजे, अशी अपेक्षा दिग्दर्शक-निर्माते आणि कलाकारांची आहे.
काय आहेत कारणे?
आर्थिक तोटा
निर्मिती खर्च वाढला
प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद
ओटीटीकडून प्रतिसाद मिळेना
सरकारचे पाठबळ नाही
नवीन मराठी वेब सीरिज निर्मितीची घोषणा हल्ली फारसी होताना दिसत नाही. फक्त यू-ट्यूब चॅनेलवर काही सीरिज पाहायला मिळतील. पण, सीरिजचे जग मंदावले आहे. नवीन वर्षात सीरिजचे जग रुळावर येईल, असे वाटते.
– नितीन वाघ, कलाकार.
हेही वाचा
Nashik News : सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित
पुण्याच्या प्रश्नांबाबत आ.धंगेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अठरा वर्षांपासून डोक्यात होती गोळी!
The post मराठी वेब सीरिजचे जग मंदावले; ओटीटीवर थंड प्रतिसाद appeared first on Bharat Live News Media.