सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्हयात सोमवारपासून सुरु केलेला लाक्षणिक संप मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते कैलास वाघचौरे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हयातील सुमारे 1388 ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. या संपाला, सरपंच परिषद, जिल्हा ग्रामसेवक युनियन, ग्रामरोजगार सेवक … The post सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित appeared first on पुढारी.

सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित

नाशिक: Bharat Live News Media वृत्तसेवा- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्हयात सोमवारपासून सुरु केलेला लाक्षणिक संप मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते कैलास वाघचौरे यांनी दिली.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हयातील सुमारे 1388 ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. या संपाला, सरपंच परिषद, जिल्हा ग्रामसेवक युनियन, ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आदींनी पाठिंबा दिला होता. संपादरम्यान राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. यात नाशिक जिल्हयातील सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होते. संपापुर्वी राज्यातील जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या ऑनलाईन बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा :

Nashik News : एमआर धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
पुण्याच्या प्रश्नांबाबत आ.धंगेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Food Adulteration : खाद्यान्नातील भेसळ जीवघेणी ! जाणून घ्या भेसळ कशी ओळखावी?

The post सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित appeared first on Bharat Live News Media.

Go to Source