पुण्याच्या प्रश्नांबाबत आ.धंगेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पुणे : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे, रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ, ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी अशा पुण्यातील महत्त्वाच्या विषयांबाबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
रिक्षा मालक व चालकांना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ करण्यात यावे, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, याशिवाय शनिवारवाडा परिसरातील 100 मीटर परिघात बांधकाम करण्यास केंद्रीय पुरातत्व विभागाने निर्बंध घातले आहेत. जुने वाडे मोडकळीस आले आहेत. याबाबत राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा द्यावा. मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सदनिकांना मिळकत करातून सूट देण्यात यावी, अशा मागण्या आ. धंगेकर यांनी निवेदनात केल्या आहेत.
हेही वाचा
Mumbai : केस, अंतर्वस्त्रात लपवले ९ कोटींचे कोकेन, युगांडाच्या महिलेला अटक
सुधाकर बडगुजर-सलीम कुत्ता यांच्यातील पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा
रेल्वेच्या डब्याला आग; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मॉकड्रील
The post पुण्याच्या प्रश्नांबाबत आ.धंगेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट appeared first on Bharat Live News Media.