अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील अचलपूर येथे आज (दि. १८) नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी (NIA) च्या दोन पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत एका विद्यार्थ्याला पथकाने ताब्यात घेतले आहे. अचलपूर शहरातील अबकारी चौकात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित विद्यार्थी हा नागपूर येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या घरी छापा टाकून लॅपटॉप, मोबाईल तसेच इतर साहित्य ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. Amravati News
जिल्ह्यातील अचलपूर हे अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. दरम्यान, आता येथे एनआयएने धडक देऊन कारवाई केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. Amravati News
Amravati News पथकाकडून वडिलांनीही सोबत येण्याचा आग्रह
एनआयए च्या पथकाने अचलपुरातून संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनीही सोबत येण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांनाही अमरावती येथील ग्रामीण पोलिसांच्या मंथन हॉलमध्ये आणण्यात आले. येथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवादित ग्रुप सोबत जोडला गेला असल्याचेही समजले आहे.
आज सोमवारी पहाटेच ‘एनआयए’चे पथक अचलपूर येथे पोहचले. अचलपूर आणि सरमरसपूरा पोलिसांचे संरक्षण घेऊन त्यांनी अकबरी चौक परिसरातील एका घरावर छापा टाकला. पोलिसांच्या १५ वाहनांचा ताफा येथे पोहचला होता. छापेमारीबाबत मात्र ‘एनआयए’ने अद्याप तपशील दिलेला नाही. स्थानिक पोलिसांनीही याबाबत गुप्तता पाळली आहे.
Amravati News दहशतवादी कारवायांत गुंतल्याचा संशय
या विद्यार्थ्याला अचलपरातून ताब्यात घेतल्यानंतर अमरावतीला आणले गेले. अमरावतीमध्ये चोख पोलिस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी एनआयएकडून सुरू आहे. एनआयएने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय एनआयएला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने सुरु केल्याचेही समजते.
हेही वाचा
अमरावती : व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश
अमरावती : महानुभाव पंथातील ‘साहित्य शिरोमणी’ कारंजेकरबाबा यांचे निधन
अमरावती : सीआरपीएफ जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू
The post अमरावती : अचलपूर येथे ‘एनआयए’ने विद्यार्थ्याला घेतले ताब्यात appeared first on Bharat Live News Media.