राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधा

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वप्नांचं शहर म्हणून राज्याची राजधानी मुंबईचा उल्लेख केला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मात्र जागेची उपलब्धता ही फार मोठी समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई यानंतर आता राज्य सरकार तिसरी मुंबई साकारणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात हे … The post राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधा appeared first on पुढारी.

राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्वप्नांचं शहर म्हणून राज्याची राजधानी मुंबईचा उल्लेख केला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मात्र जागेची उपलब्धता ही फार मोठी समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई यानंतर आता राज्य सरकार तिसरी मुंबई साकारणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात हे शहर साकारले जाणार आहे. (Third Mumbai)
तिसऱ्या मुंबईची कल्पना सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ नोव्हेंबर २०२२ला मांडली होती. आता आपल्याकडे दोन मुंबई आहेत, पण पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्गी लागल्यानंतर तिसरी मुंबई साकारली जाईल, रस्ते आणि मेट्रोच्या बाजूने नवे शहर साकारले जाईल. बंदराशी कनेक्टिव्हिटी असलेले आणि एक परिसंस्था म्हणून आकारास येणार हे शहर असेल असे ते म्हणाले होते. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात राज्य सरकारने तिसऱ्या मुंबईचे बृहद प्रारूप मंजुर केल्याचे म्हटले आहे.

🚨 Maharashtra govt gives go ahead for building a new city called ‘Third Mumbai’ around Navi Mumbai airport. pic.twitter.com/H22Uu0LGCn
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) December 18, 2023

तिसऱ्या मुंबईत काय असेल? Third Mumba
विकसित शहराला आवश्यक त्या सर्व सुविधा तिसऱ्या शहरात असतील. लक्झरियस, तसेच परवडणारी घरे, व्यापारी संकुलं, डेटा सेंटर, बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी हब, बँका, विस्त संस्थांसाठी आवश्यक त्या सुविधा, नॉलेज पार्क अशा सगळ्या सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत.
काय अपेक्षित आहे? Third Mumba
1. खारघर येथे बीकेसीसारखी सुविधा
२. नवी पनवेल ते कर्जतसाठी रेल्वे कॉरिडॉर
३. एमएमआरमधील दुरच्या ठिकाणांचा विकास
४. न्यू टाऊन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (NTDA)
५. दोनशे गावांचा समावेश
हेही वाचा

‘मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित’
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवले समुद्रकिनारा स्‍वच्छ करणारे यंत्र
कोल्हापूरची हवा दिल्ली, मुंबईसारखीच प्रदूषित…

The post राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source