गोव्यात दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णचा दर्जा : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजी : गोव्यात आता दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष आयटीआय केल्यास दहावी उत्तीर्ण व दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णच्या समान धरले जाईल. त्याचबरोबर सरकारी नोकरीसाठी अशा उमेदवारांना संधी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. CM Pramod Sawant गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पर्वरी येथील नव्या इमारतीचे उद्घाटन … The post गोव्यात दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णचा दर्जा : मुख्यमंत्र्यांची घोषणा appeared first on पुढारी.

गोव्यात दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णचा दर्जा : मुख्यमंत्र्यांची घोषणा

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : गोव्यात आता दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष आयटीआय केल्यास दहावी उत्तीर्ण व दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णच्या समान धरले जाईल. त्याचबरोबर सरकारी नोकरीसाठी अशा उमेदवारांना संधी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. CM Pramod Sawant
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पर्वरी येथील नव्या इमारतीचे उद्घाटन आज (दि.१८) सकाळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. CM Pramod Sawant
गोवा शिक्षण मंडळ बाह्य शिक्षणाची (एक्सटर्नल) सुविधा देणार आहे. तालुकावार शाळा निश्चित करून मंडळाने या सुविधा द्याव्यात. गोव्याबाहेरील बोगस शिक्षण संस्थाना आळा घालण्यासाठी ही सुधारणा गरजेची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा 

गोवा : आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या ताफ्यातील वाहनाला बसची धडक

गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक

गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

The post गोव्यात दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णचा दर्जा : मुख्यमंत्र्यांची घोषणा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source