वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. त्यामुदती पर्यंत सरकारने आरक्षण संदर्भात काही भुमिका न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. १७ डिसेंबरला ही बैठक घेणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. १५) सांगितले.
यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली, हे १७ तारखेच्या आत आम्हाला कळवा. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय, असा संशय येत आहे. १७ तारखेला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला, असा इशारा ही मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.
उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मंत्र्यापैकी एकाही मंत्र्यांने आमच्याशी अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. १७ डिसेंबर रोजी होणारी निर्णायक बैठक ही दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान होणार आहे, १७ डिसेंबरला आंदोलनाची दिशा एकदा ठरविली तर सरकार आणि आमच्यामध्ये चर्चेचा विषय संपणार आहे. मंत्री मंडळाचे शिष्टमंडळात आणि आमच्यात जे ठरले होते त्याचे व्हीडिओ, चिठ्ठीसह सर्व पुरावे आम्ही मिडीयामध्ये देणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये जिथे सभा झाली होती, त्याच ठिकाणी आती १७ डिसेंबरची बैठक होणार आहे. प्रत्यक्ष समाजाच्या हिताचा विषय असल्यानं सर्वांनी उपस्थित राहावे, हे आमंत्रण महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला आहे. कुणीही आमंत्रणाची वाट पाहात बसू नका. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेदरम्यान ही बैठक होईल असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल
The post मराठा आरक्षण : ‘१७ डिसेंबर सरकारसाठी पुन्हा नवा अल्टिमेटम’ ; जरांगे-पाटील ठरवणार रणनीती appeared first on पुढारी.
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. त्यामुदती पर्यंत सरकारने आरक्षण संदर्भात काही भुमिका न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. १७ डिसेंबरला ही बैठक घेणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. १५) सांगितले. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील …
The post मराठा आरक्षण : ‘१७ डिसेंबर सरकारसाठी पुन्हा नवा अल्टिमेटम’ ; जरांगे-पाटील ठरवणार रणनीती appeared first on पुढारी.