छ. संभाजीनगर : शेलगाव ते घाटनाद्रा मार्गावर कारला आग; होरपळून एकाचा मृत्यू

नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर एका कारने पेट घेतला. त्यानंतर कारमधील व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) पहाटे ५ च्या सुमारास घडली. संजय दगडू जंगले (वय ४३, रा. सारोळा, ता. कन्नड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर शेलगाव शिवारातील विलास … The post छ. संभाजीनगर : शेलगाव ते घाटनाद्रा मार्गावर कारला आग; होरपळून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

छ. संभाजीनगर : शेलगाव ते घाटनाद्रा मार्गावर कारला आग; होरपळून एकाचा मृत्यू

नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर एका कारने पेट घेतला. त्यानंतर कारमधील व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) पहाटे ५ च्या सुमारास घडली. संजय दगडू जंगले (वय ४३, रा. सारोळा, ता. कन्नड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर शेलगाव शिवारातील विलास सोनाजी मनगटे यांच्या शेताजवळ कारने (एम. एच. २० इ. इ. ०२७०) अचानक पेट घेतल्याने गाडीतून निघणाऱ्या ज्वाला सकाळी रनींगसाठी जाणाऱ्या मुलांना दिसल्या. त्यांनी इतरांना आवाज देत तत्काळ शेलगावचे पोलीस पाटील सलीम नब्बी पटेल यांना ही खबर दिली. त्यानंतर पिशोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कारमधील संजय जंगले यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
पिशोर पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाची पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. आर. डोईफोडे करीत आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार
छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल
छ.संभाजीनगर: कारकीन येथे कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून; पतीला अटक

The post छ. संभाजीनगर : शेलगाव ते घाटनाद्रा मार्गावर कारला आग; होरपळून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर एका कारने पेट घेतला. त्यानंतर कारमधील व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) पहाटे ५ च्या सुमारास घडली. संजय दगडू जंगले (वय ४३, रा. सारोळा, ता. कन्नड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनाद्रा रोडवर शेलगाव शिवारातील विलास …

The post छ. संभाजीनगर : शेलगाव ते घाटनाद्रा मार्गावर कारला आग; होरपळून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source