हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू

हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तब्बल एक महिना उलटून गेला आहे. अद्याप हमास आणि इस्त्राइलमधील संघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष चिघळतच आहे. नुकतचं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आरोप  केला आहे की, “हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. ” (Israel-Hamas war)
इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू एका निवेदनात  म्हणाले की, इस्त्राइल गाझामधील नागरिकांना इजा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना लढाईचे क्षेत्र सोडण्याचे आवाहन करत असताना, हमास-इसिस त्यांना सुरक्षित भागात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. हमास “माणुसकीच्या विरोधात जावून आमच्या स्त्रिया, मुले आणि वृद्धांना  क्रूरपणे ओलीस ठेवत आहे”.
दरम्यान इस्रायलने गेल्या महिन्यात झालेल्या हमास हल्ल्यातील मृतांची संख्या १,४०० वरून १,२०० पर्यंत सुधारित केली आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हैट यांनी सांगितले.
हेही वाचा 

Diwali Bonus : दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..! आव्हाडांची पोस्ट चर्चेत
इस्रायल-हमास संघर्ष : पंतप्रधान मोदींनी केली इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्‍याशी चर्चा

The post हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तब्बल एक महिना उलटून गेला आहे. अद्याप हमास आणि इस्त्राइलमधील संघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष चिघळतच आहे. नुकतचं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आरोप  केला आहे की, “हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. ” (Israel-Hamas war) इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू एका निवेदनात  म्हणाले की, इस्त्राइल गाझामधील नागरिकांना इजा करण्यापासून परावृत्त …

The post हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू appeared first on पुढारी.

Go to Source