फ्रान्‍स अध्‍यक्षांचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले….,

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गाझामधील लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध लोकांवर इस्रायलकडून होणार्‍या बॉम्बहल्ल्‍याचे समर्थन होवूच शकत नाही, असे स्‍पष्‍ट करत आता युद्धविरामाने इस्रायलला फायदाच होणार आहे. त्‍यांनी गाझामधील नागरिकांसह लहान मुलांची हत्‍या करणे थांबवले पाहिजे, असे आवाहन फ्रान्‍सचे अध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन ( French President Macron) यांनी ‘बीबीसी’ला मुलाखती देताना केले. मात्र हे आवाहन इस्‍त्रायला … The post फ्रान्‍स अध्‍यक्षांचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले…., appeared first on पुढारी.

फ्रान्‍स अध्‍यक्षांचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले….,

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गाझामधील लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध लोकांवर इस्रायलकडून होणार्‍या बॉम्बहल्ल्‍याचे समर्थन होवूच शकत नाही, असे स्‍पष्‍ट करत आता युद्धविरामाने इस्रायलला फायदाच होणार आहे. त्‍यांनी गाझामधील नागरिकांसह लहान मुलांची हत्‍या करणे थांबवले पाहिजे, असे आवाहन फ्रान्‍सचे अध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन ( French President Macron) यांनी ‘बीबीसी’ला मुलाखती देताना केले. मात्र हे आवाहन इस्‍त्रायला झोंबले असून, इस्‍त्रायलचे अध्‍यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांना उलट फ्रान्‍सच्‍या अध्‍यक्षांनाच सुनावले आहे. ( Gaza ceasefire )
Gaza ceasefire : काय म्‍हणाले फ्रान्‍सचे अध्‍यक्ष ?
‘बीबीसी’ला दिलेल्‍या मुलाखतीत फ्रान्‍सचे अध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन म्‍हणाले की, गाझा शहरात आता बॉम्‍बफेक सुरु ठेवण्‍याचे कोणतेही कारण नाही. उलट आता युद्धविरामाने इस्रायलला फायदाच होणार आहे. फ्रान्स हमासच्या दहशतवादी कृत्‍याचा स्पष्टपणे निषेध करतो; परंतु त्‍याचबरोबर स्वतःचे संरक्षण करण्याचा इस्रायलचा अधिकाराची जाणीव ठेवत आता गाझा शहरावरील बॉम्बहल्‍ले थांबवावेत. अमेरिका आणि ब्रिटनही युद्धविरामाच्या आवाहनात सामील व्हावे, अशी इच्छाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
Gaza ceasefire : इस्त्रायलच्या  पंतप्रधानांनी दिले उत्तर
मॅक्रॉन यांनी केलेल्‍या आवाहनाला इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निवेदन जारी केले आहे. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, “जागतिक नेत्यांनी इस्रायलचा नव्हे तर हमासचा निषेध केला पाहिजे. हमास (आज) गाझामध्ये करत असलेले हे गुन्हे उद्या फ्रान्‍सची राजधानी पॅरिस, अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि जगात कोठेही केले जातील.”

Macron calls on Israel to stop killing Gaza’s women and babies https://t.co/HpPUJzYZu8
— BBC News (World) (@BBCWorld) November 10, 2023

हेही वाचा : 

‘भुकेने तडफडून मृत्‍यू झाला असता….’ गाझात अमेरिकन नर्सने अनुभवल्‍या मरणयातना
‘गाझा मुलांसाठी स्मशानभूमी बनत आहे : UN सरचिटणीसांनी पुन्हा दिला इशारा
Israel-Hamas War : अमेरिकेने इस्‍त्रायलला फटकारले! गाझा शहर ताब्‍यात घेण्‍यावरुन दिला इशारा

 
The post फ्रान्‍स अध्‍यक्षांचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले…., appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गाझामधील लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध लोकांवर इस्रायलकडून होणार्‍या बॉम्बहल्ल्‍याचे समर्थन होवूच शकत नाही, असे स्‍पष्‍ट करत आता युद्धविरामाने इस्रायलला फायदाच होणार आहे. त्‍यांनी गाझामधील नागरिकांसह लहान मुलांची हत्‍या करणे थांबवले पाहिजे, असे आवाहन फ्रान्‍सचे अध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन ( French President Macron) यांनी ‘बीबीसी’ला मुलाखती देताना केले. मात्र हे आवाहन इस्‍त्रायला …

The post फ्रान्‍स अध्‍यक्षांचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले…., appeared first on पुढारी.

Go to Source