डोंबिवली: खोणी पलावा येथे टेम्पोने ८ वाहनांना उडविले; झोमॅटो बॉयचा मृत्यू

डोंबिवली: खोणी पलावा येथे टेम्पोने ८ वाहनांना उडविले; झोमॅटो बॉयचा मृत्यू

नेवाळी (ठाणे): Bharat Live News Media वृत्तसेवा : डोंबिवली जवळील खोणी पलावा मध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. टेम्पो चालकाने टेम्पो आपल्या क्लिनरला चालवायला दिल्याने त्याने समोरील  ७ ते ८ वाहनांना उडविले. या अपघातात झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यत फरफटत गेला होता. त्यात या झोमेटो बॉय चा मृत्यू झाला असून सौरभ यादव असे त्याचे नाव आहे. मनपा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी क्लिनरला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
खोणी तळोजा महामार्गावर असलेल्या पलावा सिटीत शनिवारी रात्री हा भीषण अपघात झाला. क्लिनरचा टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सात ते आठ दुचाक्यांना टेम्पोने धडक दिली. या अपघातानंतर परिसरात नागरिक जमा झाले होते. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी परिसरातील नागरिकांचा झालेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता त्यांची समजूत काढली. पिकअप टेम्पो चालकाने क्लिनरला टेम्पो चालवायला दिल्याने हा अपघात घडला आहे. मात्र, या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. तर सात ते आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे क्लिनर सह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून  टेम्पो मालकाचा शोध सुरु आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा 

ठाणे : अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील लॅबोरेटरीला आग
ठाणे : पावसाने उडवली दाणादाण; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
हिट अँड रन प्रकरणात ठाणेदारांना हलगर्जीपणा भोवला; एकाचे निलंबन,एकाची बदली