नगदवाडी जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकली

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा कांदळी वडगाव (ता. जुन्नर) 14 नंबरच्या नगदवादी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार वर्षाची बिबट्याचीमादी रविवारी ( दि.२३) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अडकली . या बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. नगद वाडी येथील शेतकरी खंडू भिवाजी भोर यांच्या शेतामध्ये …

नगदवाडी जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकली

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा कांदळी वडगाव (ता. जुन्नर) 14 नंबरच्या नगदवादी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार वर्षाची बिबट्याचीमादी रविवारी ( दि.२३) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अडकली . या बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
नगद वाडी येथील शेतकरी खंडू भिवाजी भोर यांच्या शेतामध्ये दोन दिवसापूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. शेतकऱ्यांना तीन बिबट्यांचे अनेकदा दर्शन होते. या ठिकाणी बिबट्याचे कुटुंबच असावे असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी ऋषिकेश भोर, संदीप भोर, गणेश भोर, अनिल भोर, प्रशांत भोर, रवी भोर यांनी या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी वन विभागाकडे केली होती.
आणखी दोन बिबटे मोकाट
दरम्यान या ठिकाणी आणखी दोन बिबटे असून वन विभागाने त्यांनाही पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक विशाल गुंड, बिबट शीघ्र कृती दलाचे सदस्य रोशन भोर,संतोष कुतळ, रवी काळे, ऋषी गायकवाड, बबन निकम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
दरम्यान या परिसरामध्ये अद्यपही दोन बिबटे असून वन खात्याने पुन्हा या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. सायंकाळी पाच नंतर कोणीही शेताच्या कडेला एकट्याने फिरू नये. तसेच सोबत एखादी काठी असं असावी. खिशात मोबाईल असेल तर त्यात गाणी लावावी. जेणेकरून जवळ बिबट्या असेल तर तो पळून जाईल असे आवाहन वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा

13 वर्षांपूर्वी त्सुनामीत गेलेल्या पत्नीचा मृतदेह ‘तो’ आजही शोधतोय
कुस्तीपटू बजरंग पुनियावर पुन्हा निलंबनाची कारवाई
‘जेम्स वेब’ कडून बारा अनोख्या नवजात तार्‍यांचा शोध