महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील गोळी घालण्याचा प्रकार

जळगाव – पुढारी वृत्तसेवा – महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते याची चर्चा सुरू असतानाच या आंदोलनातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून …

महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील गोळी घालण्याचा प्रकार

जळगाव – Bharat Live News Media वृत्तसेवा – महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते याची चर्चा सुरू असतानाच या आंदोलनातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.


या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना “माझ्या नादी लागशील तर पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर” अशी जाहीर धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी ज्याठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. तसेच त्यावेळी मंचावर तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख व नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र यातील कुणीही या धमकीला विरोध तर सोडाच उलट टाळ्या वाजवून, हसून दाद दिलेली दिसली. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असणाऱ्या चाळीसगावमध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदाराला गोळी घालण्याची जाहीर धमकी देण्याचा प्रकार प्रथमच घडला असून याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.
शेतकऱ्यांसाठी १२ दिवस जेल भोगणारे, वारकरी, युवक, आशा, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देत प्रसंगी पदरमोड करून त्यांची कामे करणारे आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याच्या देण्यात आलेल्या या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून अजूनही चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते सावरलेले नाहीत. त्याच नैराश्यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली धरणे आंदोलन करत आहेत. हे चाळीसगाव आहे, येथे अशा विकृत राजकारणाला कधीच थारा मिळाला नाही आणि मिळणारही नाही. अशा समाजविघातक प्रवृत्तीला पुढे करून जर कुणी राजकारण करणार असेल तर त्याला निवडणूकीत जागा दाखवण्याची ताकद देखील चाळीसगावच्या सुज्ञ जनतेमध्ये आहे. असे वक्तव्य आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
मला आत्ताच आपल्या माध्यमातून ये समजले आहेत हा अतिशय गंभीर प्रकार आहे एका व्यासपीठावर उभे राहून माहित मधून गोळ्या घालण्याचे धमकी देणे व त्यात जगण्याचे स्वारस्य नाही यापेक्षा गंभीर घटना असू शकत नाही जबाबदार पदाधिकारी समोर असे बोलतात व ते बसून टाळ्या वाजवता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट टाकून कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले.
हेही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप
Nashik Teachers’ Constituency 2024 : निवडणुकांची रणधुमाळी बरोबरोच मतदारांना महागडी प्रलोभनं