महत्त्वाची बातमी! राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये?

महत्त्वाची बातमी! राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बहुधा, राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होईल, असे सांगण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.