परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे?जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे.( NEET-PG Exam) देशभरात झालेल्या ‘नीट’ आणि ‘नेट’ …

परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे?जयंत पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे.( NEET-PG Exam)
देशभरात झालेल्या ‘नीट’ आणि ‘नेट’ परिक्षांमधील गैर- व्यवहार पुढे आले. ‘नीट’ पेपरफुटी आणि ‘नेट’ परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध स्तरामधुन संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. दरम्यान आज (दि.२३) होणारी नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या एक्स पाेस्‍टमध्‍ये केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
NEET-PG Exam : परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ?
जयंत पाटील यांनी आपल्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली. आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे. अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल.”
हेही वाचा 

NEET-PG Exam : आज होणारी नीट परीक्षा पुढे ढकलली 
NEET Exam : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण; चौघांना अटक