सोलापूर : पोखरापूर येथे शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले

सोलापूर : पोखरापूर येथे शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले

पोखरापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे (४९ वर्षे) शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना आज (रविवार) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय विश्वनाथ लेंगरे असे जीवन संपवलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरापूर तालुका मोहोळ येथे दत्तात्रय लेंगरे हे कुटुंबासमवेत राहत होते. शेती व दुग्ध व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करतात. रविवार दिनांक २३ जून रोजी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या दरम्‍यान त्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानुसार तत्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्‍यांना दाखल करण्यात आले. दरम्‍यान उपचारापूर्वी त्‍यांना मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत दत्तात्रय लेंगरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची खबर चंद्रकांत लेंगरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा : 

NEET पेपर फुटी प्रकरण : महाराष्‍ट्र ‘एटीएस’ने घेतले दोन शिक्षकांना ताब्‍यात

बिहार : एका आठवड्यात तिसरा पूल कोसळला, मोतिहारीमध्ये 2 कोटी रुपयांच्या 50 फूट लांब पूलाचे सुरू हाेते काम

Maharashtra Assembly Elections | महत्त्वाची बातमी! राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये?