Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीजन ३’ चा पुन्हा एकदा नवं कॉन्सेप्ट प्रेक्षकांसमोर हजर आहे. २१ जून रोजी रात्री ९ वाजता या शोचे प्रीमियर झाले होते. २२ जून रोजी घरातल्या सदस्यांची संपूर्ण दिनचर्या स्ट्रीम झाली. सर्व स्पर्धकामध्ये लक्षवेधी ठरलीय. ‘जनता की एजेंट’ बनून शोमध्ये सना सुल्तानने एन्ट्री घेतलीय. ती जेव्हा कमालीची उर्दू बोलते, तेव्हा ऐकून वाटते की, कोचिंग क्लास सुरु आहे. सना सुल्तान सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये आहे. सध्या इतकी कमालीची उर्दू बोलते की, आपल्या गोड बोलण्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे. सुंदर तर आहेच!
अधिक वाचा –
लग्नानंतर धर्म बदलणार सोनाक्षी? काय म्हणाले जहीर इकबालचे वडील?
कोण आहे सना सुल्तान खान?
सना सुलतान पेशाने एक मॉडल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला क्वीन खानच्या नावाने ओळखले जाते. तिने आपले करिअर एक ब्लॉगर म्हणून सुरु केले होते. तिचे व्हिडिओज खूप लोकप्रिय होते. त्यानंतर तिने TikTok वर देखील व्हिडिओ बनवले होते आणि लिप सिंकिंग व्हिडिओ ॲपवर ट्रेंड करू लागली. तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली होती.
अधिक वाचा –
सोनाक्षीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी; घरदार उजळले; मेहंदी फोटो व्हायरल
सना सुल्तान खानचं करिअर
सना खानने मॉडलिंग सुरू केले होते. अनेक प्रिंट जाहरातींध्येही दिसली होती. २०१९ मध्ये ‘यूसी मिस क्रिकेट’चा किताब जिंकल्यानंतर तिला बिलबोर्ड न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वायर बिल्डिंगमध्ये पाहण्यात आलं होतं. यासाठी तिला १० लाख रुपये मिळाले होते.
सनाला शैरी मानच्या ‘दिलवाले’, काका की ‘गुस्ताखी’, बी प्राकच्या ‘रूहेदारियां’ यासारख्या जैजी बी और मिलिंदच्या ‘गाबा की जोडी’ सारख्या सुपरहिट म्युझिक व्हिडिओसाठी ओळखलं जातं.
अधिक वाचा –
स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज
सना सुल्तानचे चित्रपट
संगीतातील योगदानासाठी सनाला २०२३ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके आयकॉन ॲवॉर्ड फिल्म्स इंटरनॅशनल दुबईमध्ये ‘शायनिंग स्टार ऑफ द ईयर’ ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.
शिवाय, सना सुल्तान खान ‘लॉस्ट ड्रीम’ (२०१६) आणि ‘एन एवरलास्टिंग लव्ह’ (२०१९) सारख्या हिंदी शॉर्ट चित्रपटांमध्येही दिसली आहे.