अ‍ॅमेझॉन नदीत पिर्‍हानासारख्या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध

वॉशिंग्टन ः अ‍ॅमेझॉन नदीत पिर्‍हानासारख्या माशाची एक नवी प्रजाती आढळून आली आहे. या माशाच्या तोंडात माणसाच्या दातांसारखे दात असून, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मधील सौरोनसारखे त्याचे डोळे आहेत. या माशाला ‘पाकु’ असे संबोधले जाते. मात्र, त्याला चित्रपटातील सौरोनवरूनच वैज्ञानिक नाव देण्यात आले असून ते ‘मायलोप्लस सौरोन’ असे आहे. हे पाकु मासे पिर्‍हानाचेच अगदी जवळचे नातेवाईक …

अ‍ॅमेझॉन नदीत पिर्‍हानासारख्या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध

वॉशिंग्टन ः अ‍ॅमेझॉन नदीत पिर्‍हानासारख्या माशाची एक नवी प्रजाती आढळून आली आहे. या माशाच्या तोंडात माणसाच्या दातांसारखे दात असून, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मधील सौरोनसारखे त्याचे डोळे आहेत. या माशाला ‘पाकु’ असे संबोधले जाते. मात्र, त्याला चित्रपटातील सौरोनवरूनच वैज्ञानिक नाव देण्यात आले असून ते ‘मायलोप्लस सौरोन’ असे आहे.
हे पाकु मासे पिर्‍हानाचेच अगदी जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे पिर्‍हाना आणि या माशामध्ये बर्‍याच वेळा गफलत होते. संशोधक ज्यावेळी तशीच एक मत्स्य प्रजाती ‘एम. शोम्बुगकी’चा अभ्यास करीत असताना या नव्या मत्स्य प्रजातीचा शोध लागला. खरे तर हे मासे 1841 मध्येच अमेझॉन नदीत शोधण्यात आले होते. मात्र, संशोधकांनी त्यावेळेपासूनच ही एक वेगळीच प्रजाती आहे याकडे दुर्लक्ष केले होते. आता या माशावर नवे संशोधन झाले असून, त्याची माहिती ‘निओट्रॉपिकल इचथायोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संशोधकांनी एम. शोम्बुर्गकी या माशाच्या जनुकीय रचनेचा अभ्यास केल्यावर दिसून आले आहे की, एम. शोम्बुर्गकी, एम. सौरोन आणि एम. एलन्स या तीन वेगवेगळ्या प्रजाती आहेत. अगदी बारकाईने निरिक्षण केल्यावर या तिन्ही प्रजातींच्या माशांच्या शारीरिक रचनेतही सूक्ष्म फरक असल्याचे दिसून आले.
हेही वाचा 

पक्ष्यांचे पूर्वज डायनासोर होते; मग ते उष्ण रक्ताचे कसे?
‘माझे कपडे उतरवले, आणि मग…’; सेक्स स्कँडल प्रकरणी सूरज रेवन्नाला अटक
आमदारच्या पुतण्याचा कारनामा…! विरुद्ध दिशेने गाडी चालवून एकाला जागीच चिरडले