निवृत्तिनाथ महाराज पालखीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी आषाढी वारीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पालखीपूजन करून आरती केली. त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज विश्वस्त ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सुहास कांदे, संपर्क नेते भाऊलाल चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजप प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, रिपाइं नेते प्रकाश लोंढे, गणेश गिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पंचवटीतील घटनेबाबत निवेदन
पंचवटीमध्ये झालेल्या तणावाबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व रिपाइं आठवले गटातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, ॲड. प्रशांत जाधव यांच्यासह पक्षाच्या शहर कमिटीचे सदस्य सचिन मालेगावकर, सचिव मंडळ सदस्य दिनेश सातभाई, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
मुलांवर येणारा ताण, मानसिक आरोग्यावर हाेणारा परिणाम अन् पालकांची भूमिका
नाशिक : ‘मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचाही खून करा’- एनडीसीसी बँकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कर्मचाऱ्यांची चर्चा