चार जणांशी लग्न, पाचव्यांदा ‘लिव्ह इन’मध्ये अन् तिचा धक्कादायक शेवट

चार जणांशी लग्न, पाचव्यांदा ‘लिव्ह इन’मध्ये अन् तिचा धक्कादायक शेवट

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ३७ वर्षांच्या महिलेची तिच्याच प्रियकराने हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना नागपाडा परिसरात घडली.
आरती विजय सिंग ऊर्फ सरस्वती सानप असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर सिराजउद्दीन जमालउद्दीन शेख ऊर्फ चाँद (४१) याला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
नागपाडा येथील ऋषी मेहता चौकाजवळील दलित मित्र स्व. जयसिंगभाई पी. सोलंकी उद्यानाला लागून असलेल्या फुटपाथवर आरती ही सिराज -उद्दीनसोबत राहत होते. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, गेल्या एक वर्षांपासून ते दोघेही तिथे लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. परिसरातील रहिवाशांना त्यांनी ते दोघेही पती-पत्नी असल्याचे सांगितले होते. १२ जूनला आरती आणि सिराज उद्दीन यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादातून त्याने तिच्यावर हत्याराने वार केले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारी आरतीचा मृत्यू झाला होता.
तपासात सिराजउद्दीनने तिच्यावर क्षुल्लक वादातून चाकूने हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवारी त्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरतीचे खरे नाव सरस्वती सानप असून तिने एका मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. त्यानंतर तिने अन्य तीन तरुणांशी लग्न केले होते. या तिघांपासून तिला सात मुले झाली होती. त्यांच्याशी पटत नसल्याने तिने सर्वांना सोडून दिले होते. गेल्या एक वर्षांपासून ती सिराजउद्दीनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, असे तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा : 

’लिव्ह इन’मधून महिलेचा खून, झाडावर मृतदेह लटकावून रचला बनाव
Live in Relationship : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधला वाद गाठतोय क्रूरतेचा कळस: ठाणे परिसरात सहा महिन्यांत ४१ महिलांचा खून