नागपूर : वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले

नागपूर : वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले

नागपूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा मूळचे अमरावतीचे यशोधरा नगर येथील एका वृद्ध दाम्पत्य हे नातवाच्या लग्नासाठी मुलीकडे आले होते. येथे वद्ध दाम्‍पत्‍याने गळफास घेत जीवन संपवले. या घटनेने चंदननगर हादरले या घटनेने समाजमन सुन्न झाले. श्रीराम बाबुराव कटरे (वय 85) आणि शकुंतला श्रीराम कटरे (वय 82) अशी या वृद्ध दांपत्याची नावे आहेत. या दोघांनीही जीवन का संपवले. या विषयीचे गूढ मात्र कायम आहे.
नागपुरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चंदन नगरात ही घटना घडली. या कटारे दाम्पत्याला पाच मुली असून आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलींना वाढविले, सर्वांचे लग्न झाले मात्र दोघांचे वय वाढत असताना प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. आजार, दवाखाने या चक्रात हे दांपत्य कधी या मुलीकडे तर कधी त्या मुलीकडे असे राहत होते. नागपुरातील मुलीकडे नातवाचे लग्न असल्याने ते चंदन नगरात ज्योती पारधी या मुलीकडे राहायला आले. नातू तेजसचे महिनाभरापूर्वी लग्न झाले. सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, अशा वेळी या दोघांनी हा टोकाचा निर्णय का घेतला हे न समजण्यासारखे आहे.
शुक्रवारी रात्री नातेवाईकाकडे वाढदिवस असल्याने मुलगी ज्योती आणि घरचे कुटुंबीय हुडकेश्वर येथे गेले. वृद्ध दांपत्य दोघेच घरी होते. याच वेळी ही घटना घडली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पारधी कुटुंबीय आल्यानंतर खूप वेळ आवाज देऊनही कोणी दरवाजा उघडला नाही. अखेर मुलगा तेजसने मागच्या दरवाजाने जाऊन घरात प्रवेश केला तेव्हा समोरचे चित्र बघून सर्वांना धक्काच बसला. पती श्री राम कटरे स्वयंपाक खोलीत तर पत्नी शकुंतला या बेडरूम मधील पंख्याला साडीने गळफास लावलेले स्थितीत होते. तातडीने इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे व पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलकडे रवाना करण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
हेही वाचा : 

…तेव्हा ७० खासदार निघून गेले होते; शरद पवारांनी सांगितल्या जुन्या आठवणी

माझ्याप्रमाणेच शिक्षक करेक्ट कार्यक्रम करतील : एकनाथ शिंदे

मुलांवर येणारा ताण, मानसिक आरोग्यावर हाेणारा परिणाम अन् पालकांची भूमिका