पेपरफुटीवर वरवंटा; १ कोटी दंड, दहा वर्षे कैद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नीट आणि नेट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घोळामुळे देशभरात गदारोळ सुरू असताना केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात शनिवारी मध्यरात्रीपासून कठोर कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार एक कोटी रुपये जबर दंड व दहा वर्षे कैदेची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नीट आणि नेट या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या परीक्षांमधील घोळ समोर आल्यानंतर …

पेपरफुटीवर वरवंटा; १ कोटी दंड, दहा वर्षे कैद

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : नीट आणि नेट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घोळामुळे देशभरात गदारोळ सुरू असताना केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात शनिवारी मध्यरात्रीपासून कठोर कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार एक कोटी रुपये जबर दंड व दहा वर्षे कैदेची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नीट आणि नेट या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या परीक्षांमधील घोळ समोर आल्यानंतर देशभरात गदारोळ उठला. शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणात गुन्हे नोंदवणे व इतर प्रकारची कारवाई करणे ही प्रक्रिया सुरू असतानाच या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही सारी स्थिती असताना केंद्र सरकारने पेपरफुटीबाबतच्या कायद्याची अधिसूचना गुरुवारी रात्री जारी केली. त्यामुळे आता प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मिन्स अ‍ॅक्ट 2024 लागू झाला आहे. या कठोर कायद्यांतर्गत परीक्षेतील पेपरफुटी व गडबडीतील आरोपींविरुद्ध गंभीर व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. भरती परीक्षेतील पेपरफुटी अथवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास आरोपीला कमीत कमी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात असणार आहे. गुन्हा गंभीर असल्यास आरोपीची शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकेल. याशिवाय आरोपीला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
संबंधित संस्थेलाही जबाबदार धरणार
नवीन पेपरफुटीविरोधी कायद्यानुसार भरती परीक्षेच्या संचालनासाठी नियुक्त केलेल्या आयोजक संस्थेलाही जबाबदार धरले जाणार आहे. परीक्षेत गडबड झाल्यास संबंधित संस्थेकडून एक कोटी रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यासोबतच पुढील चार वर्षे कुठल्याही परीक्षेचे आयोजन करण्यावर बंदी लादली जाणार आहे. परीक्षेत एखादी संस्था संघटित गुन्हेगारीत सामील असल्याचे सिद्ध झाल्यास या संस्थेच्या संपत्तीवर जप्ती आणून परीक्षेचा संपूर्ण खर्चही वसूल करणार.