यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलिस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.
रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणार्‍यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत पोहोचविण्यात त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हातभार लावला. 2012 मध्येही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मेडिकल प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी अटक केली होती. चालू नीट प्रकरणात बिहार पोलिसांनी तपासाची व्याप्ती अन्य राज्यांत वाढविली. यातून रवीचे नाव समोर आले. त्याने स्वत:ही एमबीबीएस केलेले आहे. रोहतकला पीजीला प्रवेशही घेतला; पण यादरम्यान परीक्षा माफियांच्या संपर्कात तो आला आणि स्वत:ही एक्झाम माफिया बनला.