महाड : ईंसाने कांबळे येथील गोहत्येच्या निषेधार्थ महाडमध्ये मोर्चा

महाड : ईंसाने कांबळे येथील गोहत्येच्या निषेधार्थ महाडमध्ये मोर्चा

महाड, Bharat Live News Media वृत्तसेवा : पाच दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी (दि. 22) विविध हिंदू संघटनांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रायगडात अशा घटनांची पुनरावृत्ती घडल्यास हिंदू समाज आक्रमक होईल असा रोखठोक इशारा हिंदू सकल समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी दिला आहे. पुष्टीकरणाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्था राहता कामा नये बहुसंख्येया आधारेच कायदा पालन केला जातो असे त्यांनी निदर्शनास आणले. मागील वर्षभरातली महाड तालुक्यातील ही तिसरी संताप जनक घटना असून या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले होते.
शनिवार चवदार तळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा विराट मोर्चा हुतात्मा कमलाकर दांडेकर चौकातून बाजारपेठेमधून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला, यावेळी उमेश गायकवाड यांनी सर्वांच्या वतीने उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. आपल्या सुमारे पंधरा मिनिटाच्या आक्रमक भाषणामध्ये उमेश गायकवाड यांनी ईसाने कांबळे येथे झालेला हा गोवंश हत्या प्रकरणाचा विषय हिंदू मुस्लिम धर्माचा विषय नसून त्या पलीकडचा पोहोचला असल्याचे नमूद केले. गोवंश हत्येचा कायदा 1995 -96 मध्ये करण्यात आला मात्र त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळण्यास 2015 वर्ष यावे लागले याची त्यांनी आठवण करून दिली.
हिंदूंवर अशा पद्धतीचे मोर्चे काढण्याची वेळ का येते याचे कारण स्पष्ट करताना योग्य वेळी रक्त सांडावयास, एकत्र येण्यास, हिंदू कमी पडत असल्याचे सांगून या ठिकाणी हिंदुत्ववादी होण्यास आपण विसरलो असल्याचे नमूद केले. आज गाईचे रक्त पाहायला लागते याचे कारण आपण संघटित होत नाही याबद्दल खंत व्यक्त करून आज जमलेली वज्रमुठ कायम ठेवून भविष्यात याच पद्धतीने अशा घटनांना सामोरे जावे लागेल असे सांगितले.  केवळ समाजातील 16% हिंदू कडवट असून तो 60% होण्याची गरज असल्याचे सांगतानाच असे झाल्यास राजकारणापेक्षा राष्ट्र कारण ,धर्मकारण, अर्थकारण व संस्कृती कारणाची रेष मोठी होईल व असे समाजकंटकांना समोर येणे मुश्किल होईल असा विचार मांडला.
आगामी काळात लव जिहाद व लँड जिहादलाही उत्तर देण्याची वेळ आली असून यासाठी सर्व हिंदू बांधवांनी सकल हिंदू समाज म्हणून संघटित राहून कार्यरत होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. तत्पूर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांना गोहत्या संदर्भातील निवेदन देण्यात येऊन येत्या एक महिन्याच्या आत यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निघालेल्या या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते. शहरातील विविध भागांमध्ये व मोर्चाच्या मार्गावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसानंतर महाडमध्ये सकल हिंदू समाज हा मोठ्या संख्येने संघटित झाल्याचे समाधानी चित्र नागरिकांना पहावयास मिळाले.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
चार दिवसापूर्वी झालेल्या घटनेतील 16 आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, गुरुवारी त्यांच्या या पोलीस कोठडी मध्ये पाच दिवसाची वाढ करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांनी Bharat Live News Mediaशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा :

नाशिक : मालेगाव कृऊबा आवारात आढळली बांधून ठेवलेली बेवारस 97 गोवंश जनावरे
नाशिकमध्ये ७२५ किलो गोवंश मांस जप्त, माहिती मिळताच पोलिसांनी अडवला ट्रक
नाशिक : कत्तलीसाठी लपवून ठेवलेले ६७ गोवंश जनावरे घोटी पोलीसांनी घेतले ताब्यात