बीड: अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी, आजाराशी झुंज
सुहास चिद्रवार
केज: एका सर्वसामान्य कुटुंबातील २६ वर्षीय तरुणाने आईवडिलांच्या कष्टाचे चीज करत सिव्हिल अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण घेतले. पुढे नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो मागील तीन वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला १० लाख रुपयांची गरज आहे. दानशूर व्यक्तीने मदत करून या तरुणाचा जीव वाचवावा. असे केज येथील रोकडे कुटुंबाने केले आहे.
केज शहरातील राहुल सुभाष रोकडे या सर्वसामान्य कुटुंबातील २६ तरुणाने आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत सिव्हिल इंजिनिअर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा असून आपला मुलगा आता इंजिनिअर म्हणून नोकरीस लागेल, आपले कुटुंब सुधारेल. अशी अपेक्षा पोटाला चिमटा घेऊन मुलाला शिकविणाऱ्या आई – वडिलांची होती. तर राहुल हा सुद्धा नोकरीचे स्वप्न पाहत होता. मात्र त्याच्यावर आजाराचे संकट कोसळले. त्याच्या दोन्ही ही किडन्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाल्या आहेत. हे ऐकून त्याला व त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. त्याला आपले आयुष्य जगण्यासाठी आता किडणी प्रत्यारोपण करण्याची तातडीची आवश्यकता आहे.
मागील तीन वर्षांपासून तो या आजाराशी झुंज देत आहे. तर किडनी प्रत्यारोपणासाठी त्याला दहा लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची व कमजोर असल्याने त्याला व त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेवून त्याला मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपली मदत त्याला निरोगी नवजीवन देणारी ठरणार असून त्यासाठी (मो. नं. ९४२२७४२६६९ ) या नंबरवर फोन पे, गुगल पे द्वारे त्याला आर्थिक मदत करावी. असे रोकडे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.
दिवसाआड डायलिसिस
राहुल रोकडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याला दोन दिवसाला डायलिसिसच्या उपचाराला सामोरे जावे लागते. त्यासाठी त्याच्या वडिलांनी स्थावर मालमत्ता विकून हे उपचार मागील तीन वर्षांपासून सुरू ठेवले आहेत. तर सुदैवाने किडनी प्रत्यारोपणासाठी शासनाकडे केलेल्या रजिस्ट्रेशनप्रमाणे काही दिवसातच त्याला किडणी प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी त्याला दहा लाख रुपये खर्च करावा लागणार आहे.
हेही वाचा
बीड: केज-कळंब रोडवर रिक्षा पलटी; तिघे जखमी
बीड : राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवले
बीड: केज येथे ‘ज्ञानराधा’च्या सुरेश कुटेसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल