अमरावती: खासदार वानखडेंनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: खासदार कार्यालयाचा वाद अमरावतीत टोकाला पोहोचला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय ताब्यात घेतले.  प्रशासनाकडून दडपशाही व दिरंगाईचा आरोप करत खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेसने कार्यालय ताब्यात घेतले. याआधी हे कार्यालय माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे होते. …

अमरावती: खासदार वानखडेंनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: खासदार कार्यालयाचा वाद अमरावतीत टोकाला पोहोचला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय ताब्यात घेतले.  प्रशासनाकडून दडपशाही व दिरंगाईचा आरोप करत खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेसने कार्यालय ताब्यात घेतले.

याआधी हे कार्यालय माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे होते. त्या पराभूत झाल्यामुळे हे कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, या संदर्भात पत्र देऊनही प्रशासनाकडून कार्यालय ताब्यात देण्यास दिरंगाई करण्यात येत होती. त्यामुळे अखेर आज यशोमती ठाकूर यांच्यासह खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत कुलूप तोडून संबंधित कार्यालय ताब्यात घेतले आहे.

यावेळी यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना उद्देशून, हवे तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, मात्र आम्ही कार्यालय ताब्यात घेत आहोत, असे सांगितले. पालकमंत्री पाटील यांनी ठाकूर यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी करत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

दडपशाही, दादागिरी विरुद्ध आवाज : यशोमती ठाकूर

आम्ही संयम पाळणारे लोक आहोत. मात्र इथले पालकमंत्री, जिल्हाधिकारी प्रशासन काहीच ऐकायला तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. आमचा खासदार निवडून आल्यावर निकालाच्या दिवशी सर्टिफिकेट देखील तीन तास उशिरा देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कार्यालयासाठी पत्र दिल्यावरही अद्यापपर्यंत ताबा देण्यात आला नाही. आणि आता एकाच कार्यालयाचे दोन कार्यालय करून एक राज्यसभेच्या खासदाराला आणि दुसरे लोकसभेच्या खासदाराला देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही दादागिरी आहे. त्यामुळे हा विषय आम्ही सहन करू शकत नाही. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलो आहे. आमच्या खासदाराचा देखील मान सन्मान झाला पाहिजे. आमच्या मतदारसंघात देखील लोकच राहतात, असे यावेळी आमदार ठाकूर म्हणाल्या. डीपीडीसीचा फंड हा टक्केवारी घेऊन वाटप केला जातो, असा आरोप करत या दडपशाही विरोधात आम्ही आवाज उचलला आणि आज खासदार कार्यालय ताब्यात घेतले, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा 

अमरावतीत दिवसागणिक एका शेतकरी संपवतोय जीवन
अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Chandrababu Naidu : अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी! चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा