वाशिम : लोणी बुद्रुक येथील तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथील तरूणाने गावातील नदी शेजारील झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी (दि.२२) सकाळी ११च्या सुमारास घडली. पवन गजानन मोरे (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी बुद्रुकचे पोलीस पाटील संजय गाडे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रिसोड …

वाशिम : लोणी बुद्रुक येथील तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथील तरूणाने गावातील नदी शेजारील झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी (दि.२२) सकाळी ११च्या सुमारास घडली. पवन गजानन मोरे (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी बुद्रुकचे पोलीस पाटील संजय गाडे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रिसोड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व मृतदेह शव विच्छेदनसाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :

धाराशिव: भोत्रा येथे वाळू उपशावरुन वाद: गोळीबारात एकजण जखमी
छ. संभाजीनगर: हर्सूल येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून
Nashik Crime News| एमडी विक्री प्रयत्नातील एक जण ताब्यात