कूर-मिणचे कालवा अस्तरीकरणास २१ कोटी निधी मंजूर : आबिटकर
मिणचे खुर्द, Bharat Live News Media वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यातील कूर ते मिणचे कालव्याच्या १७ किलोमीटरच्या अस्तरीकरण करण्याच्या कामास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून २१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कूर ते मिणचे बुद्रुक दरम्यान पाण्याचा विसर्ग सध्या पाट-पाणी पध्दतीने सुरु
दूधगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याअंतर्गत पोटकालवा असणाऱ्या कूर ते मिणचे बुद्रुक दरम्यान पाण्याचा विसर्ग सध्या पाट-पाणी पध्दतीने सुरु आहे. या पध्दतीमुळे मोठ्या प्रमाणात पाझर होत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारपड होत आहेत. तसेच पाण्याचे आवर्तन विहीत वेळेमध्ये पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने हा कालवा अस्तरीकरण करण्याची मागणी होत होती. या मागणीनुसार आमदार प्रकाश आबिटकर यांनी सदरील अस्तरीकरणाचा प्रस्ताव कृष्णा खोर विकास महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. त्यास शासनाने प्रकल्पाच्या मुळ किंमतीमधून खर्च करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.
मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या मागणीला यश
अस्तरीकरणाच्या कामाकरीता कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या सन २०२४ – २५ सालच्या प्रापण सुचीमधून २१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील कामाची निविदा लवकरच प्रसिध्द करण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांची अस्तरीकरणाची वर्षानुवर्षांची असलेली मागणी पूर्ण होणार आहे.
हेही वाचा
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
कोल्हापूर : कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे निधन
कोल्हापूर : कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यात खून; पतीला अटक