अक्कलपाडा वितरकांसाठी लवकरच पैसे मिळणार : आ. पाटील

अक्कलपाडा वितरकांसाठी लवकरच पैसे मिळणार : आ. पाटील

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा – अक्कलपाडा प्रकल्पातील डाव्या व उजव्या कालव्याच्या मुख्य वितरीका, मुख्य वितरकांची मायनर आणि इतर वितरकांसाठी अकलाड, सांजोरी, सुट्रेपाडा, नवलाणे, नुरनगर, कुसूंबा,वार आणि कावठी या गावातील शेतकर्‍यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनीचा मोबदला लवकरच मिळणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे.
या संपादित जमीनीचा एकूण मोबदला 8 कोटी 5 लक्ष 89 हजार 320 रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. यापैकी जलसंपदा विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयात अकलाड नवलाणे, सांजोरी, सुट्रेपाडा, नूरनगर येथील 23 शेतकर्‍यांचे 1 कोटी 46 लक्ष रुपये जमा केले असून उर्वरीत निधीसाठी अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग यांची भेट घेऊन निधीची मागणी केली असल्याचे धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
संबधित गावातील संपादीत झालेल्या शेतजमीनीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकरी सतत संपर्क साधत आहेत. तर एकूण 8 कोटी 5 लक्ष 89 हजार 320 रु. पैकी 6 कोटी 59 लाख 88 हजार 952 रुपये निधी धुळे मध्यम प्रकल्प विभागाला मिळणे बाकी आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे राज्य शासनाकडून अद्याप सदर निधी आलेला नसल्याने आ. कुणाल पाटील यांनी तो निधी लवकरात लवकर मिळावा म्हणून जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे मागणी केली आहे. जलसंपदा विभाग धुळे यांनी भूसंपादन अधिकार्‍याकडे जमा केलेला 1 कोटी 46 लक्ष 368 रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वितरीत करण्यात येणार असून उर्वरीत निधीसाठी मंत्रालय आणि कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी कळविले आहे.
हेही वाचा:

जळगाव : तरूणाची पॉलीसीची रक्कम देण्याच्या नावाखाली फसवणूक
थरकाप उडवणारी घटना! आईचा खून करून त्याने….