आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य आचार्य आणि काशीचे महान अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. आचार्य लक्ष्मीकांत यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते.
अयोध्येत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेवेळी श्री रामाचा अभिषेक १२१ पुजार्यांच्या टीमने केला होता. लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. रामलल्लाच्या अभिषेकवेळी त्यांच्यासह ५ जण गर्भगृहात होते. पंडीत लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे.