75 वर्षांच्या धाकड आजीबाईंचा घरीच तगडा व्यायाम!

नवी दिल्ली : उतारवयातही उत्साही, ऊर्जावान आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजग असलेले अनेक लोक आहेत. ही मंडळी तरुणाईलाही नवी प्रेरणा देत असतात. सध्या अशाच एका आजीबाईंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 75 वर्षांची आजी घरीच तगडा व्यायाम करताना दिसत आहे. आजीची ऊर्जा पाहून अनेक लोक अवाक् झाले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. …

75 वर्षांच्या धाकड आजीबाईंचा घरीच तगडा व्यायाम!

नवी दिल्ली : उतारवयातही उत्साही, ऊर्जावान आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजग असलेले अनेक लोक आहेत. ही मंडळी तरुणाईलाही नवी प्रेरणा देत असतात. सध्या अशाच एका आजीबाईंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 75 वर्षांची आजी घरीच तगडा व्यायाम करताना दिसत आहे. आजीची ऊर्जा पाहून अनेक लोक अवाक् झाले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की, आजी व्यायाम करत आहे. घरच्या घरी उत्साहाने त्या व्यायाम करीत आहेत. कधी भिंतींचा आधार घेऊन आजी व्यायाम करते, तर कधी घरातील वस्तू उचलून व्यायाम करते. या आजीचे वय 75 वर्षे आहे, पटणारही नाही! या वयातही आजीची इच्छाशक्ती आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘75 वर्षांची आहे, व्यायाम हा कोणत्याही वयासाठी चांगला आहे. तुम्हाला सल्ला देईल की, आठवड्यातून एकदा तरी व्यायाम करावा.
यामुळे तुम्ही स्वत:ला आजारांपासून सुरक्षित ठेवता आणि त्याचबरोबर पालकांसाठीसुद्धा हे खूप फायदेशीर आहे.’ या व्हिडीओवर अनेक यूझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिलेय, ‘कलियुग आहे. वृद्ध लोक हिंमत दाखवतात आणि आमच्यासारखे युवा झोप घेत आहेत. आमची झोप पूर्ण होत नाही.’ तर एका यूझरने लिहिलेय, ‘आपण सुरुवात तरी करायला पाहिजे.’ आणखी एका यूझरने लिहिलेय, ‘खूप छान, आपल्या शरीराची काळजी ही आपण घेतली पाहिजे.’ या व्हिडीओवर अनेक यूझर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही यूझर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक यूझर्सनी आजीकडून आपण युवा पिढीने शिकायला पाहिजे, असे लिहिलेय.