‘कल्कि 2898 एडी’ ट्रेलरमध्ये दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)

‘कल्कि 2898 एडी’ ट्रेलरमध्ये दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार प्रभास, दीपिका पादुकोण आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ लवकरचं चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २७ जून रोजी चित्रपट प्रदर्शित आधी टीमने एक नवा ट्रेलर जारी केला आहे.

डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरची पुन्हा हातमिळवणी

‘कल्कि 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर जारी
‘कल्कि 2898 एडी’ चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दीपिका पादुकोणची भूमिका लक्षवेधी आहे. नाग अश्विन द्वारा दिग्दर्शित चित्रपटात २८९८ इ.सनातील स्थापित जगाची कल्पना करण्यात आली आहे. प्रभासची भूमिका पाहायला फॅन्स खूप उत्सुक आहेत. तर बिग बी अमिताभ बच्चनदेखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
अधिक वाचा – 

रूबाबदार कालिन भैया-गुड्डू पंडितचा धमाका, ‘मिर्जापूर ३’ ट्रेलर रिलीज

ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग
ट्रेलरच्या शेवटी प्रभास आपल्या एआय-पॉवर्ड कार बुज्जीमध्ये बसलेला दिसतो. आणि आत्मविश्वासाने म्हणताना दिसत आहे की, ‘मी यासाठी तयार आहे.’
ट्रेलरमध्ये कहाणीची झलक
अमिताभ बच्चन यांनी अमर अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. १४२ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार वाक्याने होते. ते म्हणाताना दिसताहेत – ‘समय आ गया है’. तर दीपिका पादुकोण पावसाची प्रतीक्षा करताना दिसत आहे.
अधिक वाचा –

Krishna Shroff : खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना टायगरच्या बहिणीला दुखापत

‘कल्कि 2898 एडी’ कधी प्रदर्शित होणार?
चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूवीजची असून संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे. चित्रपट ३ तास ५६ सेकंदाचा असेल. २७ जून रोजी हा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.