डॉली चायवाल्याची चक्क मालदीवमध्ये टपरी!

नागपूर : नागपूरकर असलेला डॉली चहावाला देशभर प्रसिद्ध झाला आहे. परंतु, त्याच्या टपरीवर काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश व्यक्ती अन् मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेटस् आले. त्यांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्यासोबतची पोस्ट टाकली. त्यानंतर डॉली जगभर प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावर त्याचे यूझर्स लाखोच्या संख्येने झाले. आता डॉलीने 16 जून रोजी त्याच्या …

डॉली चायवाल्याची चक्क मालदीवमध्ये टपरी!

नागपूर : नागपूरकर असलेला डॉली चहावाला देशभर प्रसिद्ध झाला आहे. परंतु, त्याच्या टपरीवर काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश व्यक्ती अन् मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेटस् आले. त्यांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्यासोबतची पोस्ट टाकली. त्यानंतर डॉली जगभर प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावर त्याचे यूझर्स लाखोच्या संख्येने झाले. आता डॉलीने 16 जून रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यानंतर त्याचा चहा जगभरात प्रसिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. डॉली चहावाल्याने चक्क मालदीवमधील समुद्रकिनारी टपरी लावल्याचा हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये डॉली चहावाला मालदीवमधील समुद्रकिनारी चहा बनवताना दिसत आहे. त्यानंतर विदेशी पर्यटकांना तो चहा देताना दिसत आहे. काहीजण कौतुकाने हा काय करत आहे, ते पाहत आहेत. त्यानंतर काहीजण त्याच्यासोबत फोटोही घेताना दिसत आहेत. डॉलीचा मालदीवमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डॉलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ 16 जून रोजी शेअर केला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीव वाईब्स कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका दिवसातच हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच्यावर हजारो जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी डॉलीच्या दुबई दौर्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. आता मालदीव दौर्‍याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.