बीबीए, बीसीए, बीबीएमची अतिरिक्त परीक्षा होणार

बीबीए, बीसीए, बीबीएमची अतिरिक्त परीक्षा होणार

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : बीसीए, बीसीएस, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांची विद्यार्थी, पालकांच्या मागणीनुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीसीए, बीसीएस, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी प्रवेश परीक्षा घेतली. मात्र, राज्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागणार असल्याने मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबतचे वृत्त दै. ‘Bharat Live News Media’ने 17 जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने सीईटी सेलला बीबीए, बीसीए, बीएमएस व बीबीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिल्याचे आयुक्तांनी त्यात म्हटले आहे.